चारचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आण ; विवाहितेचा छळ

चारचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आण ; विवाहितेचा छळ 

वेब टीम कोपरगाव :  चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावे, यासाठी चक्क पतीनेच पत्नीवर वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.

याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील फिर्यादीचा सुमारे तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतरच अवघ्या आठवड्यापासून पतीने तिची इच्छा नसतानाही तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले.

तसेच फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध अनेकवेळा अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवले. जीवे मारण्याची धमकी देऊन इच्छेविरुद्ध गर्भपात केला. त्याच सोबत चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये यावे,

यासाठी पती, सासरा, सासू व दोन नणंद यांनी शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्याद दिली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments