सिक्युरिटीगार्डला मारहाण करून घातला दरोडा 

वेब टीम नागपूर : नागापूर एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रीक कंपनीतील दोन सिक्युरिटी गार्डला मारहाण करत सहा ते सात दरोडेखोरांनी लाखोंचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेत सोन्याबापु विजय पळसकर, विलास परसराम नेवसे हे दोन सिक्युरिटी गार्ड जखमी झाले आहेत.

तर याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर शिवाजी भागाजी कुदनर (वय 41 रा. आदर्शनगर, नागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा ते सात अनोळखी इसमांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसीत मिलिंद कुलकर्णी यांची झेन इलेक्ट्रिस कंपनी आहे. शुक्रवारी रात्री सिक्युरिटी पळसकर व नेवसे कंपनीमध्ये ड्यूटीवर असताना दरोडेखोर चारचाकी वाहनातून तेथे आले.

त्यांनी सिक्युरिटींना मारहाण करत कंपनीचे लॉक तोडले. त्यानंतर दरोडेखोरांनी चांदीचे मुलायम असलेल्या 17 लाख 50 हजार रूपयांच्या क्रॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या आहेत.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments