देशातील शंभर कोटी मात्राचे पूर्ण झालेले उद्दीष्ट "त्रिसूत्री "चे यश
वेब टीम नगर : देशातील शंभर कोटी मात्राचे पूर्ण झालेले उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या त्रिसूत्रीचे यश असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने संपूर्ण देशात सुरू केलेल्या मोफत लसीकरण मोहीमेचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण झाला.या विश्वविक्रमी मोहीमेत योगदान देणाऱ्या राहाता ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान आ.विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर चेअरमन मुंकूदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, उपाध्यक्ष रघूनाथ बोठे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, सोपानराव सदाफळ, भाजयुमोचे अध्यक्ष सतिष बावके, डाॅ गोकुळ घोगरे, डॉ सौ.स्वाती पवार, डॉ जहागिरदार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्स कर्मचारी यांना आ.विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, इतर देशातील लाॅकडाऊनचा कालावधीचा आताशी कुठे संपत आला आहे.यासर्व श्रीमंत राष्ट्रांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले धाडसी निर्णय देशाला पुन्हा नवी उभारी देणारे ठरले प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेली कामगिरी ही विश्वविक्रम करणारी ठरली आहे.
एकीकडे कोव्हीड संकटाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान उभे असताना प्रधानमंत्र्यांनी अतिशय धाडसाने घेतलेल्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यातही मोठे यश आले असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.
एकीकडे कोव्हीड संकटाचे सावट आणि दुसरीकडे देशातील नागरीकांना कोव्हीड लसींच्या मात्रांचे संरक्षण कवच देण्यासाठी केलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळेच देश ही विश्वविक्रमी कामगिरी करू शकला सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या पंतप्रधानाच्या त्रिसूत्रीमुळे लसीकरणात देश आघाडी घेवू शकला असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
देशातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेत योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी नर्स यासाठी सहकार्य करणार्या प्रत्येक घटकांचे सामुहीक प्रयत्न या विश्वविक्रमात असल्याचे
सांगून अजूनही लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना आ.विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
0 Comments