नगरटूडे संक्षिप्त

 नगरटूडे संक्षिप्त 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगरटुडे आता  नव्या स्वरूपात 

बातम्या आणि जाहिरातींसाठी 

संपर्क : देवीप्रसाद अय्यंगार  

मो : ९९६०४९०९७१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 भिंगारची ऐतिहासिक वेस पुन्हा बांधा : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन    

                                                                         

वेब टीम  नगर : भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पूर्ण बांधणीच्या मागणीसाठी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना निवेदन देताना  राष्ट्रवादी शहर संघटक मतीन सय्यद समवेत भारतीय जनता पक्षाचे प्रकाश लुनिया, काँग्रेस आयचे शाम वाघस्कर, आरपीआयचे युवक अध्यक्ष अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन फिरोदिया आदी उपस्थित होते.                                 

भिंगार शहर मधील ऐतिहासिक बांधकाम असलेली  भिंगार वेसचा काही भाग जिर्न झाला होता त्यामुळे वेसची दुरुस्ती करण्यात आली नव्हती त्यामुळे धोका दायक म्हणुन संपूर्ण वेस जमीनउद्ध्वस्त करण्यात आली होती व ती वेस आतापर्यंत छावणी परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेली नाही भिंगार शहराची मुख्य प्रतीक असलेले सदर वास्तू आपण त्या जागेवर त्याची लांबी, रुंदी, उंची प्रमाणे दगडी बांधकाम करून बांधण्यात यावी त्यासाठी निष्णात वास्तु शास्त्र कडून पक्का आराखडा तयार करून लवकरात लवकर भिंगारची ओळख असणारी भिंगार वेस उभारावी त्यामुळे भिंगारच्या वैभवात पुन्हा भर पडेल व वेशी जवळ पौराणिक मारुती मंदिर आहे त्यामुळे सदर वास्तूचे अतिशय महत्त्व आहे. सदर वेशीचा आराखडा तयार होण्याच्या कालावधी अगोदर सदर वेशीच्या जागेवर त्याची लांबी रुंदीची लोखंडी प्रतीकात्मक वेस त्वरित नवरात्रीच्या घटस्थापनेच्या अगोदर ५ ऑक्टोंबर पर्यंत लावावी व वेस वर भुंगऋषी प्रवेश द्वार म्हणून नाव टाकण्यात यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने छावनी परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवविवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

वेब टीम नेवासा : नेवासा तालुक्यातील धामोरी येथे एका नवविवाहितेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत सोनाली सतीश दाणे (वय २१) रा. धामोरी ता. नेवासा हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू – सासऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे पती सतीश राजेंद्र दाणे, सासू राहीबाई राजेंद्र दाणे, सासरा राजेंद्र भानुदास दाणे, भाया संदीप राजेंद्र दाणे चौघेही रा. धामोरी ता. नेवासा तसेच नणंद रेणुका रवींद्र तागड व नंदाई रवींद्र तागड दोघे रा. टोका ता. नेवासा याबाबत अधिक माहिती अशी कि,

फिर्यादीने फिर्यादीत म्हण्टले आहे कि, ८ मे २०२१ रोजी सतिश राजेंद्र दाणे रा. धामोरी ता. नेवासा याचेशी विवाह झाला. सासरी नांदत असताना लग्नानंतर १५ दिवसांनी ते २२ सप्टेंबरपर्यंत आरोपी यांनी संगनमताने तूला स्वयंपाक नीट करता येत नाही. तू पटत नाही.

माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करुन धमकी देवून वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला व घरातून हाकलून दिले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामला प्रारंभ

मौजे खडकवाडी येथील आदिवासींची जमीन आंदोलनाने झाली मुक्त

वेब टीम नगर : आदिवासींच्या जमीनी परत मिळण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने तर आदिवासी समाजबांधवांच्या सहभागाने मौजे खडकवाडी (ता. पारनेर) येथून आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामची सुरुवात करण्यात आली. बिगर आदिवासी असलेल्या धनदांडग्यांनी आदिवासींच्या जमीनीच्या ताब्याला हरकत घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली होती. यावेळी आदिवासी बांधवांनी आंदोलनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरने नांगर फिरवून आपला ताबा व जमीनीचा हक्क सिध्द केला. या आंदोलनात राजू चिकणे, नारायण चिकणे, रामदास पारधी, जिजाबा चिकणे, कैलास चिकणे, रामदास पारधी यांच्यासह स्थानिक आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते.

महाराष्ट्र शासनाने १९७४ साली राज्यातील आदिवासींच्या जमीनी परत मिळवून देण्यासाठी क्रांतिकारक कायदा केला. त्याच वेळेला आदिवासींचे जमिनीची खरेदी-विक्री आणि हस्तांतर करण्याला बंदी केली. सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय आदिवासींच्या जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही. मात्र खडकवाडी येथील मयत रामा महादू चिकणे व लक्ष्मण महादू चिकणे या आदिवासींच्या वारसांच्या १५ हेक्टर ८ आर आणि १३ हेक्टर ६७ आर जमीनीवर बिगर आदिवासी धनदांडग्यांनी बळकावण्याचा प्रयत्न चालवला होता. सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र बिगर आदिवासींच्या हरकती दूर करुन ही जमीन आंदोलनाच्या माध्यमातून मुक्त केली. आदिवासी काळी आई मुक्तीसंग्रामाचा विजय असो... अशा घोषणा देत आदिवासींनी या जमिनीमध्ये ट्रॅक्टरने नागंरणी केली. यावरुन सदर जमीन आदिवासींच्या वडिलोपार्जित मालकी वहिवाटीची असल्याची बाब सिध्द केली.

जिल्ह्यातही आदिवासींच्या जमीनी त्यांना परत मिळण्यासाठी व्यापक स्वरुपात हा लढा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनास ॲड . गवळी व ॲड . संजय जव्हेरी यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा उत्साहात

थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आवाहन : शेतकर्यांाना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा संकल्प

वेब टीम नगर : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा संस्थेचे चेअरमन संतोष फलके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्हा.चेअरमन शिवाजी फलके, सोसायटीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, भारत फलके, अरुण काळे, मच्छिंद्र जाधव, अनिल फलके, द्रोपदाबाई कापसे, सुनिल कापसे, आशाबाई ठाणगे, लहू गायकवाड आदी संचालक उपस्थित होते.

संस्थेचे सचिव विजय सोनवणे यांनी इतिवृत्ताचे वाचन करुन शासकीय विविध योजनांची माहिती दिली व कर्ज भरणार्या   सभासदांचे आभार मानले. सहाय्यक मनोहर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच संचालक पै. नाना डोंगरे यांची सरपंच परिषदेच्या नगर तालुका सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सभेत थकबाकी संदर्भात चर्चा करुन वसुली करण्याचे आवाहन करण्यात आले. सभासदांच्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा करुन शेतकर्यांचना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच बैठकिस बाबा जाधव, संजय फलके, कादरभाई शेख, अशोक कापसे, बाळू जाधव, मयुर काळे, बळवंत खळदकर, भागचंद जाधव आदी सोसायटीचे सभासद उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments