किरिट सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये - ॲड.शारदाताई लगड

किरिट सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये - ॲड.शारदाताई लगड

वेब टीम नगर : गेले तीनचार दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आमचे नेते आदरणीय खा.श्री.शरद पवारसाहेब व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब यांचेवर बिनबुडाचे आरोप करुन त्यांचेसह  महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे.ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे ते असे बेछुट आरोप करत आहे.तेंव्हा या किरीट सोमय्या महाशयांनी हवेत गोळीबार करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा ॲड.शारदाताई लगड यांनी केले आहे.

अनेक रथीमहारथींनी आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचेवर आरोप केले होते परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला.ऊलट तुम्ही आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा आदर्श घेऊन समाजात कसं वागल पाहिजे हे शिकवून घ्या.क्रुपया तुम्ही ना आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना ना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री महोदयांना ईडीची भीती दाखवू शकत नाही .ईडी काय तुम्हाला तुमचे घरची मालमत्ता वाटते का? उठसुठ ईडीचा बागुलबुवा दाखवायचा . आपण बेछुट आरोप करण थांबवावे अन्यथा आपले विरुद्ध आम्हाला आमचे अहमदनगर जिल्ह्यात तुमचे विरुद्ध फौजदारी कारवाई करणे भाग पडेल असेही  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा ॲड .शारदाताई लगड यांनी म्हटले आहे.

.

,

Post a Comment

0 Comments