बलात्काराचा बदला सामूहिक बलात्काराने घेतला !
वेब टीम रिवाः मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीवरील बलात्काराचा सूड भावांनी आरोपीच्या अल्पवयी मुलीवर उगारल्याचा आरोप होती. आरोपीच्या बहिणीने आपल्यावर पीडितेच्या दोन भावांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी भावांचा शोध सुरू केला आहे. तसंच सामूहिक बलात्काराची घटना ही सूडातून झालेली आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
६ महिन्यांपूर्वी मुलीवर झाला होता बलात्कार
ही घटना रिवा जिल्ह्यातील गढ पोलिस ठाण्याच्या परिसरातील आहे. अल्पवयीन मुलीवर ज्या दोन भावांनी बलात्कार केला त्यांच्या बहिणीवर ६ महिन्यापूर्वी बलात्कार झाला होता. सामूहिक बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या भावावर बलात्काराचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ६ महिन्यांपूर्वी आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी भावांनी आरोपीच्या १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
आरोपींचा शोध सुरू
पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकरणी रविवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार केली. रविवारी सकाळी ९ वाजता आपले आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात एकटीच होते. यावेळी पीडितेचे दोघं भाऊ घरात घुसले. त्यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि फरार झाले. अल्पवयीन मुलीचे आई-वडील संध्याकाळी घरी आल्यावर तिने त्यांना घडलेली घटना सांगितली. यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरू केला आहे.
आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी केली. त्यानतंर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फरार असलेल्या आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासाच जे सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती एएसपी शिवकुमार वर्मा यांनी दिली.
0 Comments