साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

वेब टीम नगर :  जगात ख्याती असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईमंदिराबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान साई संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदिराची पाहणी करत असतानाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल करून तदर्थ समितीची बदनामी केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ३१ जुलै रोजी साई संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्य असलेल्या सहायक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिराची पाहणी केली होती.अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदिर बंद असताना दर्शन कसे घेतले, अशी बातमी एका यूट्यूब चॅनेलने प्रसिद्ध केली होती.यात मंदिरातील फोटो व सीसीटीव्ही फुटेजही वापरण्यात आले होते. यामुळे भाविकांमध्ये गैरसमज पसरला. तसेच बदनामी झाल्याप्रकरणी अध्यक्षांनी संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी साई मंदिर सुरक्षा प्रमुख हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागप्रमुख विनोद कोते, पत्रकार राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments