शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले

शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले

वेब टीम नगर : राज्य सरकारने नुकतेच शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नावे जाहीर केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपद मिळाले. या निमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या भोवती सत्कारासाठी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली होती. मात्र तरीही आमदार काळे आज कोरोना बाधित आढळून आलेही माहिती मिळताच आमदार काळे यांनी स्वतः या बाबत कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. त्यामुळे कार्यकर्ते व चाहत्यांत चिंतेचे वातावरण होते. काही चाहत्यांनी सदिच्छा संदेशही सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले

न्यायालयाची परवानगी न घेता शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारने जाहीर केल्याचा आरोप ठेवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू आहे. यात आज औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी संस्थानचे नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठविण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी चार दिवसांनी होणार आहे.

Post a Comment

0 Comments