भर चौकात पत्रकाराला धारदार तलवार अन पिस्तूल दाखवूंन धमकी

भर चौकात पत्रकाराला  धारदार तलवार अन पिस्तूल दाखवूंन धमकी 

वेब टीम नगर : जिल्ह्याची ओळख सहकारा पुरती न राहता गुन्हेगारी जिल्हा अशी होते की काय  की काय अशी शंका येते आहे . कारण सध्या जिल्ह्यात रोज चोरी लुटमार करून अशा घटना घडत आहेत. 

 पारनेर तालुक्यात तर चक्क एका पत्रकारास तू कोणाच्या, आमदार लंके आणि राहुल झावरे जीवावर उड्या मारतोस असे म्हणून धारदार शस्त्र व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. 

 याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील पारनेर येथील पत्रकार वाघमारे यांना मोबाईलवरून फोन करून आमच्या विरुद्ध बातमी छापतो काय असे म्हणत  शिवीगाळ केली तसेच भर चौकात दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे . ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली याबाबत पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे .  वाघमारे हे पारनेर येथील आंबेडकर चौकात आले असताना प्रकाश पवार याने तू आमच्या विरोधात बातम्या देतोस . आमदार लंके आणि राहुल झावरेच्या  जीवावर उड्या मारतो  असे म्हणून धारदार तलवार व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार पारनेर पोलिसांनी प्रकाश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .. 


Post a Comment

0 Comments