आश्वासनानंतर यज्ञेश नागोडेचे उपोषण स्थगित

आश्वासनानंतर यज्ञेश नागोडेचे उपोषण स्थगित 

वेब टीम नेवासे : एम सी ए ई आर चे अधिकाऱ्यांनी कृषि पदविका धारकांच्या कृषी पदवीकेसाठीच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नेवासा तहसील समोरील दिघीच्या यज्ञेश नागोडे याचे आमरण उपोषण दोन दिवसानंतर स्थगित करण्या कृषी पदविका धारक यज्ञेश नागोडेचे उपोषण आश्वासनंतर स्थगित आले.

      बीएस्सी ॲग्री  साठी प्रवेश द्या अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्या अशी मागणी करत कृषी पदविका धारक यज्ञेश नागोडे याने नेवासा तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते.तीन वर्षाच्या कृषी पदविके नंतर बीएस्सी ॲग्री पदवीसाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळत असे परन्तु या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या बॅचला या सुविधेपासून वंचीत ठेवण्यात आले होते हा चुकीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

       राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी यामुळे  नैराश्यात आहे या विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ, कृषी मंत्री व मंत्रालयात जाऊन प्रश्न मांडले पण ते आता आंदोलसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत.

          बारामती,अमरावती,राहुरी,नेवासा आदी ठिकाणी आंदोलने होत आहेत यज्ञेश नागोडे याच्या उपोषणाला विविध संघटनेसह अनेक ग्रामपंचायतचा ही पाठिंबा मिळाला.सलग ४६ तासाच्या उपोषणानंतर निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी व महसूल नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांनी कृषी विद्यापीठामध्ये 

प्रा.फरांदे सर व एम सी ए ई आर चे अधिकारी कौसडीकर यांनी दूरध्वनीवर सदर विद्यार्थ्याचे समाधान होईल अशी चर्चा केली व प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले             उपोषण थांबविण्याचे आवाहन केल्यामुळे चांगदेव महाराज काळे,यज्ञेशचे वडील संजय नागोडे,सरपंच सचिन नागोडे,बबनराव नागोडे,जेष्ठ पत्रकार रमेश राजगिरे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे,स्वप्नील मापारी,प्रशांत देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले.( फोटो यज्ञेश )

Post a Comment

0 Comments