हॉटेलवर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका

हॉटेलवर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका  


वेब टीम नगर : नगर तालुक्यातील  हॉटेल राजयोग मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.  ही धडाकेबाज कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे . 

याबाबत समजलेली माहिती अशी की नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात नगर ते दौंड जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल राजयोग मध्ये हॉटेलचा मालक अनिल माणिकराव कर्डिले (वय ५२), अक्षय अनिल कर्डिले (वय२५ रा खंडाळा तालुका जिल्हा अहमदनगर) आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये परप्रांतीय मुलींना यासाठी बोलावून घेऊन त्यांची मार्फतीने गैरमार्गाने देह विक्री करून कुंटणखाना चालवत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.  या माहितीनुसार  पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती दिली . त्यांच्या  पथकाने छापा टाकला या छावण्यांमध्ये तीन परप्रांतीय मुली मिळून आल्यास त्यांना स्नेहालय येथे पाठवले आहे.  

दरम्यान हॉटेल मालक व मुलगा यांना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे पाचशे रुपये दराच्या १४नोटा व शंभर रुपयाच्या १५ नोटा असे एकूण साडेआठ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत हॉटेल मालक व मुलगा यांना अटक करून नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments