अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमास पाथर्डीतून अटक

अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमास पाथर्डीतून अटक 

वेब टीम नगर : बोलेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लील कृत्य करणाऱ्या नातेवाईकाच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . आरोपी पाथर्डी तालुक्यातील असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

बोलेगाव येथे राहणाऱ्या या कुटुंबातील मुलीचे वडील खासगी ठिकाणी नोकरी करतात, तर आई घरगुती व्यवसाय करते चार दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीची आई ही बाहेरून आणलेले कपडे देण्यासाठी संबंधित व्यक्ती कडे जात असताना ,त्याच वेळी पाथर्डी येथील राहणारा त्याचा नातेवाईक घरी आला व सहज भेटण्यासाठी आलो  असे सांगितले . त्यावेळी फिर्यादीने मी आणलेले कपडे देऊन येते ,असे संबंधित व्यक्तीला सांगून सदर अल्पवयीन मुलीची आई ही तिच्या लहान मुला समवेत बाहेर गेल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी ही एकटी होती.  आलेल्या अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक वर्तन केले.  आई घरी आल्यावर त्या अल्पवयीन मुलीने  रडत रडत तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली.  त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली .  नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पाथर्डीतून पोलिसांनी अटक केली आहे. 

Post a Comment

0 Comments