'या' जिल्ह्यातून ६ महिन्यात ४८० पुरुष, महिला आणि मुली बेपत्ता

'या' जिल्ह्यातून ६ महिन्यात ४८० पुरुष, महिला आणि मुली बेपत्ता

वेब टीम बुलडाणा : करोनाच्या सहा महिन्याच्या काळात बुलडाणा जिल्ह्यातून ४८० जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी १७३ पुरुष तर तब्बल ३०७ महिला व मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या मध्ये २४२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आहे आहे.

वेगवेगळ्या कारणावरून घरून न सांगता निघून जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधी मध्ये विभिन्न वयोगटातील ४८० जण जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिला व मुलींचे आहे. तर बदनामी पोटी अनेकदा तक्रारी दिल्या जात नाहीत त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बेपत्ता असणाऱ्या महिलांमध्ये १८ ते ३० या वयोगटातील महिलांची संख्या ही जास्त आहे. बेपत्ता असलेल्या एकूण ४८० पैकी २४२ म्हणजे निम्मे लोकांचा पोलिसांनी शोध लावलाय, तर इतरांचा शोध घेणे सुरू आहे. त्याचबरोबर जी अल्पवयीन मुले हरवली जातात किंवा बेवारस असतात अश्या मुलांसाठी पोलीस विभागाने १ जून ते ३० जून दरम्यान "ऑपरेशन मुस्कान" राबवत बेवारस आढळलेल्या २९७ मुलांना कायदेशीर रित्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे, ज्यामध्ये ११४ मुले तर १८३ मुलींचा समावेश आहे. हे खऱ्या अर्थाने पोलिसांचे कौतुकास्पद कार्य म्हणावे लागेल.

अलीकडच्या काळात महिला व मुलींचे न सांगता निघून जाणे किंवा पळून जाणे याचे प्रमाण वाढले आहे, समोर आलेली शासकीय आकडेवारी हीच भुवया उंचावणारी आहे.

Post a Comment

0 Comments