कंपनीच्या वेगवेगळ्या बँक अकाउंटमधून होत असे लाखोंची उलाढाल
पोलीस चौकशीत राज कुंद्रानं सांगितलं व्यवहारांचं सत्य
वेब टीम मुंबई : पॉर्न फिल्म केसमध्ये अटक झालेल्या बिझनेसमन राज कुंद्राबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. राजला अटक केल्यानंतर क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली ज्यात राज कुंद्राच्या अकाउंटमधून रोज होणाऱ्या लाखोंच्या उलाढालीचा खुलासा झाला आहे. राजला या चौकशीमध्ये रोज होणाऱ्या लाखोंच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी राजनं फेब्रुवारी २०१९ मध्ये आपण आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी सुरू करून त्यातून हॉटशॉट्स हे अॅप डेव्हलप केल्याची माहिती दिली.
हॉटशॉट्स हे अॅप डेव्हलप केल्यानंतर हे अॅप केनरिंग नावाच्या एका कंपनीला २५ हजार डॉलरच्या किंमतीला विकल्याच पोलीस चौकशीत राज कुंद्रानं सांगितलं. पण या अॅपच्या मेनटेनन्ससाठी मात्र केनरिंग कंपनीचं राज कुंद्राच्या विआन कंपनीचं टाय-अप होतं त्यामुळेच या मेनटेनन्ससाठी लाखो रुपयांचा व्यवहार विआन कंपनीच्या १३ बँक अकाउंटमध्ये होत असे अशी माहिती राज कुंद्रानं दिली.
दरम्यान क्राइम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटशॉट्सच्या सब्सक्रायबर्सच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा पैसा हा मेनटेनन्सचा व्यवहार म्हणून दाखवणं ही मोडस ऑपरेंडी आहे. मेनटेनन्सच्या नावावर करोडो रुपयांचा व्यवहार युके बेस्ड केनरिंग कंपनी राज कुंद्राच्या कंपनीच्या १३ बँक अकाउंटमध्ये करत असे. त्यानंतर काही सेल कंपनीमध्ये हा पैसा पाठवला जात असे आणि नंतर तोच पैसा राज कुंद्राच्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये जात असे.
क्राइम ब्रांचनं राज कुंद्रा आणि त्याची कंपनी विआनशी संबंधीत सर्व बँक अकाउंटमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर झालेल्या व्यवहाराबाबत फॉरेन्सिक ऑडिट करण्याची तयारी केली आहे. केनरिंग कंपनीचे सीईओ प्रदीप बख्शी यांना फरार आरोपी ठरवत त्यांच्यासाठी एलओसी लागू करण्यात आली आहे.
0 Comments