हनीट्रॅप प्रकरण ; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

हनीट्रॅप प्रकरण ; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 

वेब टीम नगर :  नुकतेच नगर  तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला होता . हनीट्रॅपची  शिकार झालेल्या शेतकऱ्याने  १८ जुलै रोजी फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी एक महिला व तिच्या साथीदाराला  अटक करण्यात आली गणेश छगन गिरी व अन्य एक महिला अशी अटक केलेल्या ची नावे आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी की महिलेने फसवणुकीच्या उद्देशाने ओळख वाढवली होती. १५ जून रोजी सकाळी फिर्यादीस वडगाव गुप्ता येथे येथील घरात बोलून घेतले होते. त्याच्याशी जवळीक साधून फोटो काढले घरात दोघे एकत्र असताना त्यावेळी एक तरुण तेथे आला  तो त्या तरुणीचा पती आहे.  दोघांना एकत्र पकडले असे भासविण्यात आले.  तिच्या साथीदाराने फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले . तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून गणेश गिरे त्याच्या मदतीने दोन लाख रुपये उकळले दरम्यान पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलेल्या तिसरा आरोपीचा गुन्ह्यात कसा  सहभाग राहिला याचा पोलीस तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments