तालुका पोलिसांची दारू अड्ड्यांवर धडक कारवाई
वेब टीम नगर : तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने नगर तालुक्यातील अनेक ठिकाणी दारू अड्ड्यांवर कारवाई करत गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी दारू भट्ट्या उद्ध्वस्त करत लाखो रुपयांची दारू नष्ट केली.
याबाबत माहिती अशी की नगर तालुक्यातील खडकी शिवारात एक महिला विनापरवाना दारू गावठी दारू विकताना पोलिसांना आढळून आली. तिच्याकडे दोन हजार रुपये किमतीचे वीस लिटर गावठी दारु पोलिसांनी नष्ट केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमगाव वाघा येथील पवार वस्ती शिवारात असणाऱ्या गावठी दारूचा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. चोवीस हजार रुपये किमतीचे चारशे लिटर दारू तयार करण्याचे कसे रसायन नष्ट करून सचिन नाथा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळकी येथील धोंडेवाडी शिवारात असणाऱ्या हातभट्टी त्यावर पोलिसांनी छापा टाकत तीन हजार रुपये किमतीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले. पोलिसांना पाहताच संतोष दिलीप पवार पळून गेला. पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. येथे सीना नदी परिसरात चार ठिकाणी चालू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करत दारू तयार करण्याचे १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे कच्या रसायनाचा नाश पोलिसांनी केला . या प्रकरणी दत्तू महिपती पवार, सोमनाथ नारायण पवार, राजू पवार ,अर्जुन मौला पवार सर्व राहणार साकत तालुका नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .नेप्ती येथील गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करत दोन हजाराची वीस लिटर दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी सुभाष रघुनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे.
0 Comments