अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल

अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल

वेब टीम मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेच्या झगमगाटामागे किती अंधार आहे आणि त्यात किती काळी कृत्य केली जातात हे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं. व्यावसाईक असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. राज कुंद्रावर पॉर्नोग्राफिक फिल्म बनवणे आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. सोमवारी राज कु्ंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. सात तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल क्राईम ब्रान्चने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि अन्य काही लोकांविरोधात एका महिलेने मुंबई पोलिसांकडे या संबंधी एक गुन्हा दाखल केला होता. राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांनी वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी ऑफर दिली आणि जबरदस्तीने पॉर्न चित्रपट बनवले असा आरोप त्या महिलेने केला आहे. या पॉर्न रॅकेटचा मास्टरमाईंड हा राज कुंद्रा आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

ब्रिटनमध्ये केंद्रीन नावाच्या एका कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. ही कंपनी ओटीपी प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट पब्लिश करायची. या कंपनीची निर्मीती राज कुंद्राने केली होती. भारतातील सायबर कायद्यापासून वाचण्यासाठी त्याने ब्रिटनमध्ये या कंपनीचे रजिस्ट्रेशन केलं होतं. राज कुंद्राच्या परिवारातील अनेक सदस्य या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि देशातील इतर ठिकाणी शूट करण्यात आलेले पॉर्न मटेरियल अपलोड करण्यात यायचे. 

राज कुंद्राने या कंपनीमध्ये१०कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं क्राईम ब्रॅन्चने स्पष्ट केलं आहे. फेब्रुवारी महिन्यातच कुंद्रा याचा या कंपनीशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं होतं. उमेश कामत नावाच्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि तो राज कुंद्रापर्यंत येऊन पोहोचला. 

Post a Comment

0 Comments