दोन लसी घेतलेल्याना महाराष्ट्र सरकार देणार ही मोठी मुभा

दोन लसी घेतलेल्याना महाराष्ट्र  सरकार देणार ही मोठी मुभा 


वेब टीम मुंबई :  बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटी-पीसीआर चाचणीऐवजी ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशांनी प्रमाणपत्र दाखवले, तरी महाराष्ट्रात यायला परवानगी आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले होते. मात्र, आता रुग्णसंख्या अटोक्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

करोना लसीचे ज्या प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक नसणार. पण, अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या कोविन अॅपवरुन प्राप्त केलेले प्रमाणपत्र असले बंधनकारक असणार आहे.

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही हा नियम लागू असेल, असंही आदेशात नमूद केलं आहे. विमानप्रवासासह, रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांनाही ही सूट लागू असेल, असंही आदेशात स्पष्ट केलं आहे. मात्र, लसीकरण झालेल्या प्रवाशांनाही करोना नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान, लसीकरण झालेल्या नागरिकांसाठीही राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचणीच्या वैधतेचा काळ ४८ तासांवरुन वाढवून ७२ तास इतका करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments