शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार ?

शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार ? 

वेब टीम नवी दिल्ली : दि. १३ जुलै रोजी देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली ते म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांची राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट झाली. याभेटी नंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले होते.  

सुरुवातीला आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ही भेट झाल्याची माहिती समोर आली होती तर त्यानंतर २०२४ च्या लोकसभा साठी ही भेट झाल्याची माहिती समोर आली.  मात्र आता या भेटीबद्दलची सर्वात मोठी बातमी आता  समोर आली आहे. या भेटीमध्ये लोकसभा बद्दल नाही तर आगामी राष्ट्रपती निवडणुकीबद्दल राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाव पुढे करण्यात आला असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. प्रशांत किशोर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर प्रियांका गांधी , काँग्रेस अध्यक्षा  सोनिया गांधी ,के.सी. वेणुगोपालआणि हरीश रावत  उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली होती.

Post a Comment

0 Comments