हरित व सुंदर नगरसाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण : मनोज पाटील

हरित व सुंदर नगरसाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण : मनोज पाटील

रोटरी सेंट्रलच्यावतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड अभियान

वेब टीम नगर  : विविध जिल्ह्यात सेवा बजावताना तेथिल रोटरी क्लबच्या कार्याशी पूर्वीपासूनच परिचय आहे. नगरमध्येही रोटरीचे सामाजिक कार्य अतिशय उत्तमरित्या चालू आहे. आताच्या काळात पर्यावरणाचा र्‍हास हा ज्वलंत विषय आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वृक्ष संख्या अतिशय कमी होत चालली आहे. त्यासाठी व्यापक वृक्षारोपण चळवळ हाती घेणे आवश्यक आहे. रोटरी सेंट्रलने माझ्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अभियान राबवून दिलेल्या शुभेच्छा खूप आनंद देणार्‍या आहेत. अशा उपक्रमांतूनच येत्या काळात नगर शहर हरित शहर म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अभियानाचा शुभारंभ गुलमोहोर रोडवरील पारिजात चौकात करण्यात आला. या परिसरात स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून १११ झाडे लावण्यात आली. याठिकाणी प्रत्येक रोपाला ट्री गार्ड लावून संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 यावेळी   रोटरी  सेंट्रलचे पीडीजी शिरीष रायते, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा, राजन नवले, कुमार नवले, ऍड.लक्ष्मीकांत पठारे, शिरीष (बापू) जानवे, स्नेहालयाचे डॉ.गिरीश कुलकर्णी, राजीव गुजर , मनपा उद्यान विभाग प्रमुख मेहर लहारे, रोटरीचे सचिव डॉक्टर दिलीप बागल, डॅा.नीलम बागल, आयपीपी प्रसन्न खासगीवाले, प्रोजेक्ट चैयरमन अमृत कटारिया, हितेश गुप्ता, धीरज नय्यर, जिग्नेश पटेल, ॲड. अभिजीत कोठारी, डॉ. सुदर्शन गोरे, महेश पोपटलालजी गुंदेचा, राजेश परदेशी, मनीष बोरा, सुनील कटारिया, उमेश रेखे, ओम नय्यर, अभिजीत देवी आदी उपस्थित होते.

ईश्वर बोरा म्हणाले की, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतल्याचा आनंद आहे. करोना काळात आपल्या सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व कळलेले आहे. झाड मुक्त हस्ताने आपल्याला प्राणवायू देत असतात. त्यामुळे जितके वृक्ष लावू तितका आपल्यालाच फायदा होणार आहे. नगर शहर हरित व सुंदर करण्याच्या कामात रोटरी परिवार नेहमीच योगदान देईल. शेवटी डॉ. दिलीप बागल यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments