८१.८ टक्के पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी

८१.८ टक्के पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी 

वेब टीम मुंबई : राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामधून करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी केली असल्याचं दिसून आलं आहे. ८१.१८ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार आहोत असं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रामधील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद नोंदवलाय. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांपैकी ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील, ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आणि ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागात राहाणारे आहेत.


Post a Comment

0 Comments