डॉक्टरचे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल
वेब टीम नागपूर : डॉक्टरने १६ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची खळबळजनक घटना सद्भावनानगरमधील हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी ३५ वर्षीय डॉक्टरविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. नंदनवन पोलिस मात्र हे प्रकरण दडपत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पोलिस डॉक्टर व हॉस्पिटलचे नाव सांगण्यास नकार देत आहेत. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी दहाव्या वर्गात शिकते. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास १६ वर्षीय मुलीची प्रकृती खालावली. आईसह ती हॉस्पिटलमध्ये आली. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला सलाइन लावले. दरम्यान, एक ३५ वर्षीय डॉक्टर तिच्याजवळ आला. डॉक्टरने तिच्याशी अश्लील चाळे केले. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीला घरी पाठविले . घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने नंदनवन पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अंजनकर, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0 Comments