कॅन्टोमेंट बोर्डाच्या कामगारांचा हा सेवानिवृत्त कर्मचारी ठरला कैवारी

कॅन्टोमेंट बोर्डाच्या कामगारांचा हा सेवानिवृत्त कर्मचारी ठरला कैवारी

फ्रन्टलाईन वर्कर  कर्मचार्‍यांच्या वेतनात आला 3 कोटींचा निधी

वेब टीम नगर : येथील भिंगार कॅन्टोमेंटच्या सेवानिवृत्त कर्मचारी अशोक भोसले यांनी कॅन्टोमेंट बोर्डाच्या कर्मचारींच्या व्यथा व प्रश्‍न केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे मांडल्या. तर वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला. या पाठपुराव्याची केंद्रीय रक्षा मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली असून, कर्मचार्‍यांच्या पगारासाठी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे मानधनसाठी  कॅन्टोमेंट बोर्डाला 3 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.

भिंगार कॅन्टोमेंट  बोर्डाच्या सफाई कर्मचारींची कुठलीही युनियन नाही. यामुळे कर्मचार्‍यांना आपले प्रश्‍न मांडता येत नाही व केंद्र सरकारवर कसल्याही प्रकारचा दबावतंत्राचा वापर करता येत नाही. मात्र कर्मचार्‍यांच्या व्यथा व प्रश्‍नांची जाणीव असल्याने भोसले यांनी केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे सदर कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मांडून पाठपुरावा सुरु ठेवला.   त्यांनी केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालय, प्रिन्सिपल डायरेक्टर, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खरमरीत पत्रं लिहिली. त्या पत्रांचा परिणाम असा झाला, की भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाच्या सफाई कर्मचार्‍यांचा पगार आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच मानधन आदींसाठी केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून 3 कोटी रुपयांना धनादेश प्रिन्सिपल डायरेक्टर यांच्या कार्यालयात नुकताच प्राप्त झाला आहे. एका अर्थानं भोसले यांनी कॅन्टोमेंट  बोर्डाच्या असंघटित सफाई कामगारांचा कैवारी होण्याचा मान मिळविला.

कोरोना महामारीची साथ चालू असताना जीवावर उदार होऊन छावणी परिषदेचे कर्मचारी फ्रन्टलाईन वर्कर स्वतःची पर्वा न करता सेवा देत आहेत. परंतु त्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडलेले आहे. तसे पाहिले तर मागील सहा महिन्यांपासून वेतन वेळेवर होत नाही. कोविड योध्दा म्हणून पुष्पगुच्छ देऊन या कामगारांचा सत्कार केला जातो, फोटो घेतले जातात, पेपर बाजी केली जाते. परंतु त्यांच्या वेतनाबाबत कुणी दखल घेत नाही. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालतो, याचाही विचार झाला पाहिजे. मासिक वेतन नसल्याने या कामगारांना गृह कर्जाचे हप्ते थकले त्यांना दंड आणि व्याज भरावे लागत आहे. जर कर्मचारी किंवा कुटुंबातील कुणी सदस्य आजारी पडल्यास कॅन्टोन्मेंन्ट हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधा नाहीत. खाजगी हॉस्पिटल परवडणारे नाहीत. घरातील व्यक्तीचे काही बरे वाईट झाल्यास उघड्या डोळ्यांनी त्यांचा मृत्यू पहायची वेळ आली आहे.

महिनो-महिने पगार न झाल्यामुळे अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचार्‍यांची झालेली असह्य आर्थिक स्थिती आणि पेन्शनधारकांची विलंबित होणारी पेन्शन, तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतरही न मिळालेला लाभ (ग्रॅच्युएटी, लीव एनकॅशमेंट, रिटायरमेंट फंड, वेतन आयोग फरक) यामुळे बिकट स्थिती आहे. याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. काही कर्मचार्‍यांनी बँक कर्ज, गृह कर्जाचे हफ्ते भरण्याकरता दुचाकी, मोबाइल गहाण ठेवले आहेत. हीच व्यथा आज महानिदेशक रक्षा संपदा नवी दिल्ली, प्रधान निदेशक रक्षा संपदा, दक्षिण कमांड व मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद अहमदनगर यांना पत्र लिहून मांडली. तसेच यावर त्वरित काही तोडगा काढावा आणि सर्व कर्मचार्‍यांचे प्रत्येक महिन्यात पगार सुरळीत व्हावेत, तसेच मागील थकबाकी मिळावी, पेन्शनधारकांना पेन्शन वेळेवर मिळावी, पेन्शनधारकांना त्यांचे ३०-४० वर्ष केलेल्या सेवेबद्दल मिळणारे सेवानिवृत्तीचे लाभ लवकरात लवकर मिळावे, यासाठी विनंतीअर्ज सादर केला.

अशोक भोसले हे स्वत:च कॅन्टोमेंट बोर्डाचे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने या असंघटित कामगारांच्या प्रश्‍नांची त्यांना चांगली जाणीव होती. हे प्रश्‍न कुठं मांडायचे, कोणाकडे दाद मागायची, कसा पाठपुरावा करायचा, याचं ज्ञान असल्यानं या कामगारांचे जे काही प्रश्‍न आहेत, त्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी भोसले यांनी घेतलेल्या पाठपुराव्याला चांगले यश येऊन सर्वसामान्य कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारींचे महत्त्वाचा आर्थिक प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे. 

Post a Comment

0 Comments