भारती विद्यापीठातील महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये छुपे कॅमेरे

भारती विद्यापीठातील महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये छुपे कॅमेरे

वेब टीम पुणे : भारती विद्यापीठातील कॅम्पसमधील स्टाफपोर्टल मध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या  बेडरूम आणि बाथरूम मध्ये अज्ञाताने छुपे कॅमेरे लावण्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  हे छुपे कॅमेरे बब्ल मध्ये लावले होते . डॉक्टर महिलेने सायंकाळी घरी परतल्यानंतर बाथरूममधील स्विच ऑन केल्यानंतर बल्ब लागला नाही, त्यानंतर छुप्या  कॅमेराचा प्रकार समोरा आला.  या प्रकरणी  पीडित महिला डॉक्टर ने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  यावरून अज्ञाता  वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार सहा जुलैला सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी७:३०या कालावधीत घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भारती विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये नोकरी असून विद्यापीठाच्या आवारातील क्वाटर्स  मध्ये राहतात त्या सहा जुलैला सकाळी पावणे नऊ च्या सुमारास घरातून बाहेर पडल्या त्यानंतर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्यानंतर फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले असता त्यांनी बल्ब लावण्यासाठी स्विच ऑन केला लागला नाही.

 दरम्यान तो बल्ब काहीसा वेगळा वाटलेणे  त्यांना शंका आली आणि इलेक्ट्रिशियन बोलून दाखवला तेव्हा त्याने छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले.  त्यानंतर फिर्यादीने अन्य दिव्यांची पाहणी केली.  तर बेडरूम मध्ये असाच बल्ब लावलेला  आढळून आल्या नंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठाचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यासह महिला पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.  भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील महिला निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करत आहेत फिर्यादी सकाळी ड्युटीला गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने  बनावट चावीच्या सहाय्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर संबंधिताने हे छुपे कॅमेरे लावले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments