अन्यथा शिवराष्ट्रसेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा
वेब टीम नगर : सक्कर चौक ते सरोज टॉकीज पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे काम सुरू असून या कामांमध्ये नियोजन नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून वाहतूक खोळंबा ही होत आहे. या कडे अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे . याबाबत शिवराष्ट्र सेनेच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व महाप्रबंधक प्रकल्प संचालक पी बी दिवान यांना निवेदन देऊन रस्त्याची कामे तातडीने व्हावीत अन्यथा अर्धनग्न आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष राधाकिसन कुलट तालुकाध्यक्ष दत्तात्रेय शिराळे शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आदी उपस्थित होते प्रकल्प संचालक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सक्कर चौक ते सरोज टॉकीज पर्यंत च्या उड्डाण पुलाच्या कामासाठी त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईन ड्रेनेज लाईन आदींसाठी इतरही लाईन फोडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा ड्रेनेज टेलिफोन इंटरनेट सेवा आदी समस्या निर्माण झाल्या आहेत या रस्त्याच्या कामात बाबतची पूर्ण गाव तरी आपल्या कार्यालयावर असून संबंधित एजन्सीने वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे या मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असून छोट्यामोठ्या अपघाता बरोबरच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तरी आपण याबाबत लक्ष घालून त्वरित या रस्त्याची कामे व्हावीत अन्यथा पुढील काळात आपल्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रसंगी अक्षय कांबळे म्हणाले अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे विविध प्रकारच्या लाईन शूटिंग चे काम मनपाचे असून निधीअभावी ते रखडले असल्याचे समजते याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास प्रत्येक विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपले कर्तव्य टाळत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागते आहे ही कामे तातडीने करण्याबाबत निवेदन देण्यात आले अन्यथा शिव राष्ट्र सेनेच्या वतीने राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले प्रकल्प संचालक पी दिवाने यांनीही निवेदनाची दखल घेऊन आपल्या मागण्यांबाबत जरूर विचार करून करून तातडीने प्रलंबित कामे केली जातील याबाबत संबंधितांना सूचना देऊ असे आश्वासन दिले.
0 Comments