कामचुकारपणा केल्यास कारवाई अटळ ; उपमहापौर भोसले यांचा इशारा

कामचुकारपणा केल्यास कारवाई अटळ ; उपमहापौर भोसले यांचा इशारा

वेब टीम नगर : महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे.  त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी या पुढील काळात प्रत्येकाने व्यवस्थित काम करावे अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, वेळ पडल्यास निलंबन केले जाईल असा इशारा  उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला . नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.  त्यावेळी ते म्हणाले की, सर्वांनी कामकाजात सुधारणा करून महापालिकेच्या कारभारात शिस्त लागेल असे काम करावे.  नगर शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत ,पूर्वी कचरा उचलल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रमाणे निर्जंतुकीकरण पावडर मारली जात होती आता ती मारली  जात नाही . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे . 

तसेच चिकन-मटण असे वेस्टेज रस्त्याच्या तसेच ओल्या नाल्याच्या बाजूला फेकले जाते त्यामुळे कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढला आहे . याबाबत उपाययोजना कराव्यात पावसाळा सुरू झाला आहे.  शहरातील काही भागात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसते त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक प्रश्नांबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर साथीचे रोगही सुरू आहेत त्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी गणवेशात ओळखपत्रासह कामावर यावे नगर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ती थोड्या प्रमाणात वाढत चालली आहे .  महापालिका आरोग्य विभागाने या कोरोनाच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करून घ्यावी जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.  शहरातील करोनाचे रुग्ण संख्या शून्य कशी होईल याकडे लक्ष केंद्रित करावे, तिसऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments