जिल्हा परिषद, आणि उमेदच्या संयुक्त विदयमाने आयोजित कोविड १९ जाणीव जागृती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेब टीम नगर : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध न्युक्लियस हॉस्पिटलच्या बालरोग तज्ञ, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे कार्यरत डॉ. चेतना गोपाळ बहुरूपी यांनी कोविड १९ कोरोना जाणीव जागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर संवाद व मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेत राजेंद्र क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर, सुनीलकुमार पठारे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी ,सोमनाथ जगताप जिल्हा अभियान व्यवस्थापक, मंजुषा धिवर जिल्हा व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभले
पंचायत समिती नगरच्या सुरेखाताई संदीप गुंड सभापती व डॉ.दिलीप पवार उपसभापती यांनी महिलांना कोविड १९ची तिसरी लाट येऊ नये म्हूणून सर्वानी मास्क,आवश्यक त्यावेळी सॅनिटायझर,हात साबणाने स्वच्छ धुवावेत व सुरक्षित अंतर ठेवावे असे सर्व उपस्थित गटातील महिलाना आवाहन केले.महिलांनी आपल्या प्रश्न विचारल्या व त्या प्रश्नांना उपस्थितांनी उत्तर दिली.
यावेळी तालुक्यातून ७४१ महिला स्वयं सहाय्यता गटातील ७८५० महिलां सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नगर गट विकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गव्हाणे तालुका व्यवस्थापक , बाबासाहेब सरोदे तालुका व्यवस्थापक, वैभव धनवटे तालुका व्यवस्थापक , वैभव मोहिते आंबादास सगर, राहुल बोर्डे,श्रीमती वृषली नवले,श्रीमती सोनाली शिंदे प्रभाग समन्वयक व सर्व समुदाय संसाधन व्यक्ती(CRP) बँक सखी ग्रामसंघ, प्रभागसंघ व गटातील सर्व अध्यक्ष सचिव व सदस्य यांनी परिश्रम घेतले.(फोटो-झेड पी १/२)
0 Comments