डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी - जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे

 डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी सुसाईट नोट प्रमाणे
संबंधितांवर कारवाई करावी - जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे

वेब टीम नगर - करंजी (ता.पाथर्डी) येथील आरोग्य उपकेंद्रातच डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनिल भिंगारे यांनी केली.

काल मंगळवार दि.6 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास जनमोर्चाचे श्री.भिंगारे आणि पदाधिकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून डॉ.शेळके यांच्या कुटूंबियांना धीर देत. त्यांनी या प्रकरणी दोषींना अटक करावी, अशी मागणी उप अधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्याकडे केली. यावेळी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दूरध्वनीवरुन संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेतली. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिस प्रशासन रात्री उशिरापर्यंत संबंधित कुटूंबियांचा जबाब नोंदवून घेत होते. रात्री 1 वा. डॉ.शेळके यांचे शव घाटी (औरंगांबाद) येथे पोस्टमार्टमसाठी पाठवून दिले.

घटना घडल्यानंतर दुपारीच डॉ.शेळके यांचे शव नगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. 12 तासानंतर ते घाटीला पाठविण्यात आले. मृत्यूनंतर ही मृतदेहाची हेटाळली झाली. यांचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही, असा गोंधळ रुग्णालयच्या दारात पहायला मिळाला. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकार्यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यात शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, उपाध्यक्ष रमेश सानप, नईम शेख आदिंनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ.शेळके कुटूंबियांशी व पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. या प्रकरणी जनमोर्चा लक्ष ठेवून असून मयत शेळके सारख्या उमद्या डॉक्टर आत्महत्येपर्यंत येतो, त्यामागे वरिष्ठांचा जाच कसा असेल? याची दखल घेण्याची गरज आहे, असे यावेळी श्री.रमेश सानप यांनी सांगितले. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ.गणेश गोवर्धन शेळके (वय 40) याने आत्महत्या  केली. पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात ही घटना मंगळवारी (दि.6) दुपारी एकच्या सुमारास घडली.

लसीकरण सुरु असतांना कार्यालयातच त्यांनी गळफास घेतला. मूळचे बहिरवाडी (ता.नेवासा) येथील डां.शेळके हे करंजी आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. लसीकरण सुरु असतांना ते तणावाखाली दिसत होते. एका कर्मचार्यांकडे त्यांनी कागद व पेन मागितला. त्यानंतर आपल्या दालनातील दार आतून कडी लावून बंद करुन सुसाट नोट लिहिली आणि आत्महत्या केली. ही गंभीर बाब असून, याबाबत हयगय करु नये, असे सूचविले. काल मंगळवारी रात्री जबाब नोंदवून घेण्याची आणि त्यानंतर डॉ.शेळके यांचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी घाटी (औरंगाबाद किंवा पुणे) ससूनला पाठविण्यासाठी पत्रे पोलिस प्रशासनाने तयार ठेवली होती. मंगळवारी दुपार पासून डॉ.शेळके यांचे पार्थिव सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातील वाहनात होते. रात्री उशिरा जबाब नोंदविल्यानंतर पार्थिव पोस्ट मार्टमसाठी घाटीला रवाना झाले. (फोटो-डॉ. शेळके )

Post a Comment

0 Comments