'खान्देशी झटका' मसाला व्यवसायाचे उदघाटन

'खान्देशी झटका' मसाला व्यवसायाचे उदघाटन 

वेब टीम नगर : आज उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत देहरे जिल्हा परिषद गटातील नवनागापूर गणातील ग्रामपंचायत नवनागापूर,चेतना कॉलनी या ठिकाणी शिवमल्हार स्वयं सहाय्यता महिला बचत गट समुहाच्या वतीने खानदेशी झटका मसाला व्यवसायचा उदघाटन समारंभ पंचायत समिती नगर सभापती सुरेखा संदीप गुंड व  डॉ. दिलीप पवार उपसभापती ,सचिन घाडगे  गट विकास अधिकारी पंचायत समिती नगर,श्रीमती.मंजुषा धिवर  जिल्हा व्यवस्थापक SIIBCB, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रण व गुलाब शिंदे साहेब सदस्य पंचायत समिती नगर,संदीप गुंड, जिवाजी लगड तालुका उपप्रमुख शिवसेना, भाऊसाहेब ताकीरे,सौ.रेणुका पुंड रा.क्रॉ.यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

  या वेळी डॉ.बबनराव डोंगरे सरपंच नवनागापूर,सागर सप्रे व मा.सौ.मंगल गोरे ग्रामपंचायत सदस्य संजय मिसाळ साहेब ग्रामविकास अधिकारी तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं.स.नगर गव्हाणे ज्ञानेश्वर BM SIIBCB मोहिते वैभव प्रभाग समन्वयक निलेश पंडित साहेब एच.डी.एफ.सी.बँक तसेच बचत गटाच्या सी.आर.पी.सविता वाघमारे व गावातील सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्ष,सचिव व महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते सदर उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी,सभापती,उपसभापती यांनी उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत असणाऱ्या योजना विषयी महिलाना योग्य मार्गदर्शन केले. शिवमल्हार स्वयं सहाय्यता गटाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार मान्यता आले.(फोटो-खान्देशी झटका )

Post a Comment

0 Comments