मुली व जावयाच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा
वेब टीम पाथर्डी : अलीकडे जमिनीवरून दोन भावात भावकीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची प्रकरणे वाढली आहेत अनेक वेळा हे वाद टोकाला जाऊन मारहाण खून यासारखे गंभीर गुन्हे देखील करतात मात्र येथे जमीन वहिवाटीस आडव्या येणाऱ्या पतीला चक्क पत्नी ,दोन मुली व एक जावयाच्या मदतीने झाडाला बांधून काठीने व दगडाने बेदम मारहाण करून जीवे मारल्याची अत्यंत गंभीर घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे .
याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की तालुक्यातील या मृत व्यक्तीला पत्नी एक मुलगा व तीन मुली असा परिवार असून मुलगा भोळसर आहे . दहा वर्षांपूर्वी पत्नीने पतीला फसवून जमीन नावावर करून घेतली तेव्हा पासून ते दोघे वेगळे राहत होते. मात्र जमीन वहिवाट करण्यास पतीने विरोध केल्यानेपॅटीस झाडाला बांधून मारहाण करीत होते . सोमवार सायंकाळी मृत व्यक्तीचे मेव्हणे त्यांच्या घरी गेला असता त्याला झाडाला बांधून पत्नी दोन्ही मुली व जावई असे चौघेजण काठीने व दगडाने मारहाण करीत असल्याचे दिसले त्यांनी विरोध केल्याने त्यांना या सर्वांनी तिथून निघून जाण्यास सांगितले . दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत संबंधित बेशुद्ध पडला होता पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले मात्र पत्नीने आपल्या पतीचा केवळ जमिनीसाठी खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments