विमान लँडिंग करताना अपघात
१७ जण ठार झाले असून, ४० जणांना वाचवण्यात यश
वेब टीम मनिला : याबाबत समजलेली माहिती अशी की, विमान अपघाता दरम्यान या विमानाला सुलू राज्यातील जोलो आयलँडवर लँडिंग करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. फिलिपिन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे लष्करी विमान लँडिंगच्या वेळी क्रॅश झाल्याची घटना रविवारी घडली. लष्कराच्या सी-१३० या विमानाने कागायन डी ओरो शहरातून उड्डाण घेतली होती. दरम्यान, या घटनेमध्ये १७ लोकांचा मृत्यू असून यातून ४० जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या त्या लष्करांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे आर्मी चीफ जनरल सिरिलीटो सोबेजाना यांनी AFP शी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, अपघातादरम्यान या विमानाला सुलू राज्यातील जोलो आयलँडवर लँडिंग करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
सोबेजाना म्हणाले की, आम्हाला घटनेची माहिती मिळताच मदत व बचाव दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. मी देवाला प्रार्थना करतो की, यामध्ये कमीत कमी लोकांचे नुकसान व्हावे. कारण यातील जास्तीत जास्त लोकांनी नुकतेच मुलभूत लष्करी प्रशिक्षण घेतले होते.
0 Comments