बाळ बोठेला फरार काळात मदत करणाऱ्या महिलेचा जामीन फेटाळला

बाळ बोठेला फरार काळात मदत करणाऱ्या महिलेचा जामीन फेटाळला 

वेब टीम नगर :  बहुचर्चित रेखा जरे  हत्याकांडाचा मास्टर माईंड  बाळ बोठे  याला फरार काळात मदत करणारी महिला अनंत लक्ष्मी वेंकटम सुब्बाचारी हिचा अटक जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुपारी हा निकाल जाहीर केला.  आरोपी सुब्बाचारी वकील आहे . यशस्विनी महिला ब्रिगेडच्या  अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती.  या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा असल्याचे  तपासात निष्पन्न झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.  आरोपी फरार असताना तो हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरात राहात  होता.  त्याला तब्बल एकशे दोन दिवसानंतर पोलिसांनी अटक केली . आरोपीला  फरार काळात मदत करणाऱ्या चार जणांना देखील पोलिसांनी अटक केली.  मात्र त्यातील आरोपी पी अनंत लक्ष्मी वेंकटम सुब्बाचारी ही महिला फरार होती तिने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता . या अर्जावर आज सुनावणी झाली न्यायालयाने आरोपी पी अनंत लक्ष्मी वेंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. 

Post a Comment

0 Comments