आमिर खानसोबत अफेअरच्या चर्चा, फातिमा सना शेखची प्रतिक्रिया
वेब टीम मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिनं अभिनेता आमिर खानसोबत 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगला गल्ला जमवला होता. 'दंगल' यशानंतर फातिमानं आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटानंतर या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या.
आमिर खान आणि फातिमा यांच्या अफेअरच्या चर्चांसोबतच आमिरची पत्नी किरण राव या दोघांमधील वाढती जवळीक पाहता नाराज असल्याचंही बोललं गेलं होतं. पण या सर्व चर्चांवर फातिमानं एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, 'सुरुवातीला या सर्व गोष्टींचा माझ्यावर फरक पडत होता. मला खूप वाईटही वाटत असे. कारण मी कोणत्याही मोठ्या स्तरावर अशाप्रकारच्या गोष्टीचा सामना केला नव्हता.'
फातिमा पुढे म्हणाली, 'एक अनोळखी लोकांचा समुह, ज्यांना मी कधीच भेटले नाही. हे लोक माझ्याबद्दल लिहत आहेत. सत्य काय आहे हे यांना माहीत नाही आणि हे वाचणाऱ्या लोकांना वाटतं की मी एक चांगली व्यक्ती नाहीये. या सर्व गोष्टींचा मला त्रास होत असे कारण माझ्याबद्दल चुकीचं बोललं जावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. पण आता मला याने फरक पडत नाही कारण मी याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. तरीही कधी कधी असेही दिवस येतात जेव्हा मला या सर्व गोष्टींचा त्रास होतो.'
आमिर आणि किरणच्या घटस्फोटची बातमी समोर आल्यानंतर या दोघांचा घटस्फोट हा फातिमा सना शेखमुळे झाल्याचा अंदाज सोशल मीडिया युझर्सनी लावायला सुरुवात केली आहे. त्यानंतर ट्विटरवर #Fatima वापरून ट्वीट करताना दिसत आहेत. अनेक युझर्स फातिमाला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
0 Comments