आज जिल्ह्यातील कोरोन बाधितांची संख्या ४९९

आज जिल्ह्यातील कोरोन बाधितांची संख्या ४९९ 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यात  पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्या घरात राहिल्याने जिल्हावासियांमध्ये आणि प्रशासनात दिलासादायक वातावरण आहे. आज नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ४९९ इतकी असल्याने काहीसे दिलासादायक वातावरण आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हा वासियांना करावे लागणार आहे.    

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ५३४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १०, राहता- ३५ ,श्रीरामपूर-३३, संगमनेर - ६१, नेवासे- ३८, नगर तालुका- १२ ,पाथर्डी - ५७ ,अकोले - ५६, कोपरगाव - ११,कर्जत - १५, पारनेर - ४४, राहुरी - १५, भिंगार शहर- ०६,शेवगाव - १२, जामखेड - ४६, श्रीगोंदे - ४२, इतर जिल्ह्यातील - ०६, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments