ओबीसी महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा पडोळे

 ओबीसी महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा पडोळे

वेब टीम नगर : ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा महिला आघाडीच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सुषमा पडोळे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याचे बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते त्यांना पुण्यात नियुक्ती पत्र देण्यात आले. या संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा साधनाताई राठोड यांनी पडोळे यांची नियुक्ती केली आहे.

पडोळे या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख म्हणून सध्या कार्यरत असून सामाजिक जाणिवेतून त्या समाजात कार्यकर्त्यां म्हणून ओळखल्या जातात.

संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ओबीसी, व्हीजेएनटी समाजातील असंघटीत आणि संघटीत महिलांना एकत्र करुन त्यांच्यासाठी कार्य करणार आहेत. या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असून, संघटनेचे विचार-ध्येय धोरण आणि आरक्षणाचा प्रश्न या महिलांना समजावून त्यांना संघटनेत सहभागी करुन घेणार असल्याचे सौ.पडोळे यांनी सांगितले.

याप्रसंगी वक्ते लक्ष्मणराव हाके, संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पुण्याचे सोमनाथ काशिद, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंगल भुजबळ आदि उपस्थित होते.

२६, २७ जूनला लोणावळा येथे आयोजित चिंतन शिबीरात प्रदेशाध्यक्षा राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्या सहभागी होणार आहेत. या निवडीबद्दल त्यांचे बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, सेनेचे नेते विक्रम राठोड, रमेश सानप, सुनिल भिंगारे, नाभिक महामंडळ महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, गुरव समाजाच्या मनिषा गुरव, ओबीसीच्या छाया नवले, स्वाती पवळे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

0 Comments