पेट्रोल-डिझेलची शंभरी, खाद्य तेल २०० पार…
अच्छे दिन आ गये!
सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांची मोदी सरकारवर टीका
वेब टीम नवी दिल्ली : देशात करोना महामारीत सामान्यांना महागाईच्या महामारीचा देखील सामना करवा लागत आहे. देशात पेट्रेल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मार्कंडेय काटजू हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. अनेक विषयांवर ते आपले मत व्यक्त करत असतात.
दरम्यान, मार्कंडेय काटजू यांनी वाढत्या महागाईवर मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले, “डिझेल आणि पेट्रोल किंमती १०० रूपयाचा वर गेल्या आहेत. सरसोचे तेल २०० रूपये, एलपीजी गॅस १००० रूपयांजवळ गेला आहे. बेरोजगारी आणि बाल कुपोषण रेकॉर्ड मोडत आहेत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था बुडत आहे तसेच आरोग्याची देखील योग्य काळजी घेतल्या जात नाही”
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं पेट्रोल दरवाढीचं कारण
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसंच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण दिलं आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात करोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या एम एस पी ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत.
0 Comments