महिला होमगार्डशी अश्लिलचाळे केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल
वेब टीम नागपूर : पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना निलंबित केले. महिला होमगार्डशी अश्लील चाळे केल्याप्रकरणात मेश्राम यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आयुक्तांनी मेश्राम यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेश्राम यांच्या तडकाफडकी निलंबनाने अन्य अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. १२ जूनला केबिनमध्ये बोलावून मेश्राम यांनी २४वर्षीय महिला होमगार्डशी अश्लील चाळे केले. तिला महागडे गिफ्ट घेऊन देण्याचे आमिष दाखविले. अन्य दोन महिला होमगार्डशीही मेश्राम यांनी आक्षेपार्ह वर्तन केले. गुरुवारी महिला होमगार्डने पोलिस उपायुक्त निलोत्पल यांच्याकडे तक्रार केली. निलोत्पल यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मेश्राम यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी विशाखा समितीच्या अध्यक्ष, पोलिस उपायुक्त विनीता शाहू करीत आहेत.
0 Comments