मध्य प्रदेशातून मुंबईत आलेला शस्त्रसाठा जप्त

मध्य प्रदेशातून मुंबईत आलेला शस्त्रसाठा जप्त

१० देशी पिस्तूल, दोन मॅगझीन आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली

वेब टीम मुंबई : मध्य प्रदेशातून शस्त्रसाठा मुंबईत विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास गुन्हे शाखेने मुलुंड येथे पूर्वद्रुतगती मार्गावर अटक के ली. लाखन चौहान(२१) असे याचे नाव असून त्याच्याकडून १० देशी पिस्तूल, दोन मॅगझीन आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या घाटकोपर कक्षाने दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक केली होती. तिघांच्या चौकशीतून लाखन याचे नाव पुढे आले. मध्य प्रदेशच्या बिरवाणी जिल्ह्यात राहाणारा लाखन आणि त्याच्या गावातील बरेच जण घरी शस्त्र तयार करतात आणि महानगरांमध्ये अवैधरीत्या तस्करी, विक्री करतात. त्या गुन्ह््यात जप्त करण्यात आलेली शस्त्रे लाखन यानेच तयार के ली होती, अशीही माहिती पुढे आली. तेव्हापासून घाटकोपर कक्षातील अधिकारी लाखनच्या मागावर होते.घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना लाखन आणि त्याचे साथीदार मोठा शस्त्रसाठा घेऊन  मुलुंड येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

Post a Comment

0 Comments