जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार कायम
वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ -उतार कायम असून तशी प्रशासनाची धाकधूकही वाढते आहे. आजची कोरोना बाधितांची संख्या कालच्यापेक्षा निम्म्याने कमी झाली असून नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या २८३ इतकी झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण काहीसे दिलासादायक झाले आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हावासियांना करावे लागणार आहे.
गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २८३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ११, राहता- ४१,श्रीरामपूर-१३ , संगमनेर - २०, नेवासे- १२, नगर तालुका- ०६ ,पाथर्डी - २४ ,अकोले - ०८, कोपरगाव - १७,कर्जत - ०८, पारनेर - ४५, राहुरी - ११, भिंगार शहर- ००,शेवगाव -२६, जामखेड - ०८, श्रीगोंदे - ३०, इतर जिल्ह्यातील - ०३, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.
0 Comments