सन्मिता धापटे - शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा नगरच्या दृष्टीने भूषणावह

सन्मिता धापटे - शिंदे यांना मिळालेला पुरस्कार  हा नगरच्या दृष्टीने भूषणावह

स्नेह ७५ चे  ईश्वर सुराणा यांचे प्रतिपादन

वेब टीम नगर : सन्मिता धापटे - शिंदे  हीने नगरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवण्याचे काम केले आहे. नगरच्या मातीत  अनेक गुणवंत कलाकार तयार  झाले असून धापटे शिंदेंच्या माध्यमातून अजून एक पुरस्कार वाढ होत आहे.  धापटे शिंदे यांच्या पुरस्काराने हे दाखविले आहे   धापटे - शिंदे यांच्या  मिळालेला पुरस्कार नगरच्या  दृष्टीने नक्कीच भुषणावह बाब आहे असे प्रतिपादन ईश्वर सुराणा  यांनी केले.

कलर्स मराठी वाहिनी वरील "सूर नवा ध्यास नवा" या स्पर्धेमध्ये नगरची सौ.सन्मिता धापटे - शिंदे विजेती ठरली त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी सौ. डावरे यांनी सन्मिताचे अौक्षण केले व गांधी यांनी गणेश शिंदे यांचा शाल देऊन सत्कार केला.यावेळी विश्वनाथ पोंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 पोंदे म्हणाले की, धापटे- शिंदे यांच्या उत्कृष्ट कामाची पावती कलर्स मराठी वाहिनीने पुरस्कार देऊन केली असून आपल्या, नगरमधील कलावंताला   हा पुरस्कार मिळाला ही अभिमानाची बाब आहे. हा सन्मान नगरकरांकरीता प्रेरणा ठरेल दरवर्षी असेच विविध पुरस्कार मिळो अशी अपेक्षा स्नेहबंध-७५ व समस्त रसिक नगरांच्यावतीने त्यांनी व्यक्त केल्या.सन्मिताला यापुढील सांगितिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

सत्काराला उत्तर देताना सन्मिता धापटे म्हणाल्या,पुरस्काराचे खरे वाटेकरी आई, वडील,बहिण,पती व नगरकर हे आहेत यांच्याशिवाय मी काहीच करू शकले नसते त्यांच्या पाठबळामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे. स्नेह -७५च्यावतीने नगरकरांनी केलेला हा सत्कार  हा परमोच आनंदाचा क्षण आहे. हा सत्कार  माझ्या पाठीवर कौतुकाची थाप आहे.या पुरस्कारनंतर माझी जबाबदारी वाढली असून नगरचा लौकीक वाढविण्याचे आपण प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.

  यावेळी प्रवचनकार गणेश शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेंद्र गांधी यांनी केले  जयश्री डावरे यांनी आभार मानले.

याप्रसंगी डॉ. प्रवीण रानडे, अजित चाबुकस्वार, देवेंद्र डावरे,  अभय गांधी, ईश्वर सुराणा, विनोद सोळंकी आदी स्नेहबंध - ७५चे सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments