लग्नाचे आमिषाने युवतीवर अत्याचार

लग्नाचे आमिषाने युवतीवर अत्याचार

वेब टीम औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्‍याने अत्‍याचार करणाऱ्या आकाश कोंडिराम जाधव (२७, रा. इंदापूर सावंगी, ता. खुलताबाद, ह.मु. मुंडवा खराडी बायपास, पुणे) याला सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी पुणे येथून अटक केली. आकाश जाधव असे आरोपीचे नाव असून त्‍याला २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी दिले. सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

या प्रकरणात ३० वर्षीय पी‍डितेने फिर्याद दिली. त्‍यानुसार, २०१६ मध्‍ये पीडितेच्या चुलत भावाबरोबर काम करणाऱ्या जाधवशी ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवत दौलताबाद, खुलताबाद येथे फिरायला नेले. त्‍याच दिवशी त्‍याने दिल्लीगेट परिसरातील एका ओयो हॉटेलवर पीडितेला नेले व तेथे जबरदस्‍ती करण्‍याच प्रयत्‍न केला, पीडितेने त्‍याला विरोध केला असता त्‍याने आपण लग्न करणार असल्याचे सांगितले व पीडितेवर बळजबरी अत्‍याचार केला.

तीन महिन्‍यानंतर त्याने तिला पुण्‍याला नेले. स्‍वारगेट येथील एका लॉजवर नेत तिथे पीडितेला दारु पाजली व अत्‍याचार केला. घटनेच्‍या दोन महिन्‍यानंतर आकाशने पुन्‍हा पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पुण्‍याच्‍या खराडी येथील एका ओयो हॉटेलवर नेत अत्‍याचार केला. दरम्यान २२ मार्च रोजी आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. ही बाब समजल्यानंतर फसवणूक झाल्याचे पीडितेला कळाले. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

Post a Comment

0 Comments