रेखा जरे हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात चालवावा : ॲड.सुरेश लगड

रेखा जरे हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात चालवावा : ॲड.सुरेश लगड 

वेब टीम नगर : बहुचर्चित रेखा जर हत्याकांड प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी अशी मागणी ज्येष्ठ  विधीज्ञ ॲड . सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री ,आणि गृहमंत्र्यानंकडे निवेदनाद्वारे केली आहे 

या निवेदनात ,सामाजिक कार्यकर्त्या व यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांची ३०नोव्हेंबर २०२० रोजी निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी एकंदरीत बारा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यानेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असे पोलीस तपासात समोर आले आहे बाळ बोठे या मुख्य सूत्रधार विरोधात पोलिसांना सक्षम पुरावे मिळालेले आहेत .  पोलिसांनी बोठे याच्यासह हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर आरोपींना अटक केली आहे.  या सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी जिल्हा न्यायालयात नुकतेच दोषारोपपत्र दाखल केलेले आहे . 

या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड . उमेशचन्द्र यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  मयत रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या . तसेच त्या यशस्वी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा होत्या . नगर शहरासह जिल्ह्यातील महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर नेहमी पाठपुरावा केला आंदोलने केली . त्यांचा नगर जिल्ह्यात फार मोठा  जनसंपर्क होता.  जरे यांच्या हत्येने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला वर्गामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलेची अशा निर्घृण हत्या होणे म्हणजे ही समाजाला काळीमा फासणारी घटना आहे . सदर घटनेमध्ये प्रथम दर प्रत्यक्ष दर्शन दोन महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत.

एका उच्च विभूषित व कायद्याची पदवी धारण करणाऱ्यानेच कायदा  पायदळी तुडवून ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे . या खटल्याचे काम तातडीने पूर्ण होऊन गुन्ह्यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ कोठे यांच्यासह सर्व आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याने हा खटला जलदगती न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी  आपणाकडे समाजहितार्थ  करत आहोत असे म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments