सुशील कुमार प्रकरणात नवा ट्विस्ट : गर्लफ्रेंडबरोबर केलेल्या भयंकर गोष्टीमुळे झाला राडा...
वेब टीम नवी दिल्ली : सुशील कुमार प्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात झालेल्या मारहाणीची सुरुवात एका मुलीपासून झाली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये आता ही एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सुशील कुमारच्या फ्लॅटमध्ये सागर आणि सोनू महाल हे राहत होते. पण या घरात एक मुलगी होती आणि तिच्यामुळेच हे प्रकरण जास्त पेटल्याचे पाहायला मिळाले आहे.
सागर आणि सोनू राहत असलेल्या घरात पार्टी होणार असल्याचे सुशील कुमारचा मित्र अजयला समजले होते. त्यामुळे अजय सागर आणि सोनू राहत असलेल्या घरामध्ये शिरला. त्यावेळी सागर आणि सोनू हे काही कारणासाठी घरातून बाहेर पडले होते. पण त्या घरामध्ये सोनू महालची गर्लफ्रेंड होती. घरात कोणी नसल्याचे पाहून अजयने सोनूच्या गर्लफ्रेंडबरोबर गैरवर्तन केले. त्याचबरोबर अजयने या मुलीबरोबर काही फोटो काढल्याचेही म्हटले जात आहे. त्याबरोबर अजयने यावेळी सोनूच्या गर्लफ्रेंडला धमकीही दिली असल्याचे समजते आहे. त्यानंतर अजय हा या घरातून निघून गेला. पण त्यानंतर जेव्हा सागर आणि सोनू हे दोघे आपल्या घरी परतले तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार समजला. सोनूच्या गर्लफ्रेंडने हा सर्व प्रकार त्यांना सांगितला.
सागर आणि सोनू यांना त्यानंतर सुशील कुमारच्या मॉडेल टाऊन येथील घरातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आले. यावेळी सागर आणि सोनू यांच्याबरोबर त्यांचे काही मित्रही होते. त्यावेळी सागर आणि सोनू यांच्यासह त्यांच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये सागरचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण जास्त चिघळले.
0 Comments