अतिरिक्त नोटाछपाई हा शेवटचा पर्याय :रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव

अतिरिक्त नोटाछपाई हा शेवटचा पर्याय :रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव

वेब टीम नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक थेट अतिरिक्त नोटाछपाई करू शकते; मात्र तो शेवटचा पर्याय आहे. पेक्षा निधी उभारणीसाठी सरकारने कोविड रोखे बाजारात आणावे, अशी सूचना रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केली आहे.

माजी केंद्रीय सचिव राहिलेले सुब्बाराव यांनी, करोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सावरताना देशातील संथ अर्थव्यवस्थेच्या उभारीकरिता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारणीबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत सुब्बाराव यांनी, रिझव्‍‌र्ह बँक सरकारच्या वित्तीय तुटीला अर्थहातभार लावण्यासाठी स्वत: त्वरित नोटाछपाई करू शकते. मात्र अतिरिक्त नोटाछपाईमुळे खर्च वाढून वित्तीय तुटीवर अधिक ताण पडू शकतो, असेही ते म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेने रोखे खरेदी केल्यास ते खुल्या बाजारातून उपलब्ध होतील, असे नमूद करत सुब्बाराव यांनी, ही खरेदी अमेरिकी चलन डॉलरच्या पर्यायात असेल, असे स्पष्ट केले. हा पैसा थेट सरकारच्या तिजोरीत जाऊ शकेल, असेही ते म्हणाले.

कोविड रोख्यांचा पर्याय उत्तम असल्याचे नमूद करत सुब्बाराव यांनी, बँकांमार्फत कमी दिले जाणाऱ्या ठेवींवरील व्याजाच्या तुलनेत रोख्यांचा पर्याय दिलासा ठरू शकतो, असे ते म्हणाले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोकड व्यवस्थापनाला पूरक ठरेल, असे त्यांनी सांगितले.

करोना-टाळेबंदीमुळे देशाचे अर्थचक्र थांबले असून वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन उणे ७.३ टक्के राहिले आहे.

Post a Comment

0 Comments