ईश्‍वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे

ईश्‍वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे

सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज : व्हर्च्युअल निरंकारी संत समागमामध्ये नगरमधील भाविकांचा सहभाग

     वेब टीम नगर : क्षणोक्षणी ईश्‍वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नुकतेच व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जोडलेल्या निरंकारी भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले. संत निरंकारी मिशनच्या वेबसाईटद्वारे या समागमाचे थेट प्रसारण करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रसह देशभरातून तसेच नगर शहर व जिल्ह्यातील भाविक नियमित सहभागी होत आहेत, असे प्रसिद्धी प्रमुख किशोर खुबचंदानी यांनी सांगितले.

     तसेच  मागील 23 मे पासून सद्गुरु माता सुदीक्षाजी आठवड्यातून तीन वेळा आपले पावन दर्शन व आशीर्वाद व्हर्च्युअल संत समागमांच्या माध्यमातून प्रदान करत आहेत.

     सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की जेव्हा आपण स्वत:च्या सुधारणेवर लक्ष केंद्रीत करु तेव्हा इतरांच्या उणिवा पाहण्यासाठी आमच्याकडे वेळच उरणार नाही. लहान-सहान गोष्टींवर जेव्हा आपण संवेदनशील होऊ तेव्हा आमच्या मुखातून असे कोणतेही बोल निघणार नाहीत जे इतरांचे मन दुखवतील. आमचे दैनंदिन जीवन असो अथवा एखादा सेवेचा प्रसंग; जेव्हा आपण कोणतीही खात्री न करता एखादी गोष्ट मानू लागतो तेव्हा त्यातून मुलभूत तथ्य हरवलेले असते. परिणामी एखाद्याचे मन दुखावले जाते. तेव्हा एका बाजूला स्वत:ला सजग ठेवून कोणतीही जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडायची आहे, जेणेकरुन आपण प्रत्येकाला आनंदच देऊ शकू.

     जागतिक पर्यावरण दिवसाचा उल्लेख करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की विधात्याने केलेली प्रकृतीची रचना अतिसुंदर आहे. प्रकृतीच्या या बाह्य सौंदर्याला आणखी झळाळी देण्याचे कार्य तर आपण करायचेच आहे, शिवाय आपल्या आंतरिक पर्यावरणाकडेही लक्ष द्यायचे आहे. आपल्या मनातील प्रदूषण दूर करुन तेही सुंदर करायचे आहे.

     व्हर्च्युअल संत समागमामध्ये जगभरातून लाखो भक्तगण नियमित सहभागी होऊन भक्तीचा आनंद घेत  आहेत.

Post a Comment

0 Comments