मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार पंतप्रधान मोदींची भेट

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार पंतप्रधान मोदींची भेट

वेब टीम नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्यात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यात भरच पडली आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी केली जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच अलिकडेच येऊन गेलेल्या तौकते चक्रीवादळाच्या मदतीसंदर्भातही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments