जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या हजाराच्या घरात

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या हजाराच्या घरात 

वेब टीम नगर : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या थोड्या फार फरकाच्या चढ उतार होतांना दिसतीये त्यामुळे शहरात काहीसं चिंतेचे  वातावरण निर्माण झाले आहे. आज कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या घरात पोहोचली असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हा वासियांना करावे लागणार आहे.    

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ९१४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ४५, राहता- ३२ ,श्रीरामपूर-५२, संगमनेर - ६२, नेवासे- ५०, नगर तालुका- ३५ ,पाथर्डी -७२ ,अकोले - ४३, कोपरगाव - ३७,कर्जत - ५६, पारनेर -९४, राहुरी - ५५, भिंगार शहर- ०१,शेवगाव - १२३, जामखेड - १०९, श्रीगोंदे - २७, इतर जिल्ह्यातील - २१, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.



Post a Comment

0 Comments