रुग्णाच्या मृत्यू नंतर अडीच वर्षांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल

रुग्णाच्या मृत्यू  नंतर अडीच वर्षांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल 

वेब टीम नगर : रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अहमदनगर मधील डॉक्टर विरोधात एका पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद नोंदविली आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर पोलिसात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगर शहरातील सक्कर चौकातील  भोसले हॉस्पिटलमधील डॉक्टर रवींद्र भोसले यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गणेश भगवान नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे. भोसले हॉस्पिटलमध्ये योगेश सुरेश भोसले (रा.वाकोडी) हे उपचारासाठी १८ डिसेंबर २०१८ रोजी दाखल झाले होते. १८ते २०  डिसेंबर२०१८ दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. भिंगार पोलीस ठाण्यात त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत योगेश भोसले यांच्या नातेवाईकांनी सिव्हिल सर्जनकडे तक्रार केली होती. सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टरानी चौकशी करून योगेश भोसलेचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच झाल्याचा निष्कर्ष काढला. तसा अहवाल भिंगार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर १ जून २०२१ रोजी डॉक्टर रवींद्र भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments