पुढील २४ तासात ५ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील २४ तासात ५ जिल्ह्यात मुसळधार  पावसाची शक्यता  

वेब टीम मुंबई : राज्यात मान्सून आधीच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभरापासून अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. आजही बऱ्याच शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. यामुळे पुढच्या २४ तासांमध्ये महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याकडून असा अंदाज जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर ३० ते ४० किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या शहरांमध्ये ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाहीतर रत्नागिरी बीड, लातूर, रायगड या जिल्ह्यांमध्येही पुढच्या तीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments