अर्धा अधिक महाराष्ट्र खुला

 अर्धा अधिक महाराष्ट्र खुला 

वेब टीम मुंबई : राज्यात कोरोनामुळं  घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता२५ टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १८जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले. 

पहिल्या टप्प्यातील १८ जिल्हे : 

ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. 

दुसऱ्या टप्प्यातील ६ जिल्हे :  

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार. 

तिसऱ्या टप्प्यातील १० जिल्हे : 

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर चौथ्या टप्प्यातील २ जिल्हे पुणे, रायगड

पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असलेल्या १८ जिल्ह्यात या गोष्टी सुरु

रेस्टॉरंट, मॉल्सगार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील चित्रपट शूटिंगला परवानगी थिएटर सुरू होतील

सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १००टक्के सुट दिली आहे ,ई कॉमर्स सुरू राहिल जिम, सलून सुरू राहणार पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही,बस १००टक्के क्षमतेने आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

लेव्हल २ मधील जिल्ह्यात काय?

५०टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू ,मॉल्स, थिएटर्स ५० टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही ,सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील . बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण,ई सेवा पूर्ण,जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के सुरू, बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने

जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल

लेव्हल ३  मधील जिल्ह्यात काय?

 अत्यावश्यक दुकाने ७ ते २ वाजेपर्यंत  ,इतर दुकाने  सोमवार ते शुक्रवार ७ ते २  ( शनिवार रविवार बंद)

मुंबई लोकलचं काय?

दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा  रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत ५ टप्पे ठरविण्यात आले असून  साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष सर्व प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यांकडून व्यवस्थित तपासून घेण्यात येत आहेत.संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल असे राज्य शासनाने सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments